सातारा प्रतिनिधी । राज्यात पार पडलेल्या निवडणुकांमुळे अनेकांच्या मैत्रीत फूट पडल्याचे आपण पहिले आहे. पणआसे काही मित्र असतात कि त्यांच्या मैत्रीवर राजकारणाचा काही फरक पडत नाही. राजकारण राजकारणाच्या जागी आणि मैत्री मैत्रीच्या जागी याचे अनेक उदारहरणे महाराष्ट्राने पहिले आहेत. त्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा आवर्जून उल्लेख करता येईल. असाच काहीसा अनुभव माजी खासदार उदयनराजे आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या बाबती पाहायला मिळतो.
या दोन नेत्यांच्या “दिल-दोस्ती-दुनियादारीची” चर्चा साताऱ्यात कायमच रंगलेली असते. परंतु निवडणूक लागल्या आणि यांच्या दोस्तीत काहीसा दुरावा पाहायला मिळाला. कारण पक्षनिष्ठेला वाहून घेतलेल्या शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंच्या पराभवासाठी मेहनत घेतली. तर, कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदेंना पाडण्यासाठी उदयनराजेंनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला. निवडणुकांच्या या रणभूमित दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षनिष्ठेला प्राधान्य दिले. त्यामुळे दोस्त दोस्त न रहा… अशी परिस्थिती निवडणूक काळात सातारकरांना पाहायला मिळाली होती.
उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचे ठरवल्यावर शिंदेनी त्यांना मानवण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु त्यांना अपयश आले. अखेर उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे निवडणूक काळात हे सख्खे मित्र पक्के वैरी बनल्यासारखं दिसून आलं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोडपट पक्षाची भूमिका पार पाडली. त्यामुळे दोघांचाही आपल्या-आपल्या मतदारसंघातून पराभव झाले. उदयनराजे खासदारकीला पराभूत झाले तर शशिकांत शिंदे आमदारकीच्या निवडणुकीत हारले. निवडणूक काळात हे दोन्ही मित्र एकमेकांपासून दूर गेले होते.
परंतु निवडणुकीच्या धामधुमीनंतर तब्बल एका महिन्याने दोन्ही नेत्यांची शेंद्रे येथे एका लग्न लग्नसोहळ्यात भेट झाली. आणि सोहळ्याच्या निमित्ताने दोघेही समोरासमोर आल्यावर निवडणुकीतील ही दुश्मनी एका मिठीत सामावून गेली. निस्वार्थ मैत्री असलेल्या या दोन्ही नेत्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याचं साऱ्यांनी पाहिलं. त्यानंतर, या भेटीचीच चर्चा पुन्हा एकदा साताऱ्यात रंगली होती.