हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं, सर्वांची यादी देतो- उदयनराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, ईडीने हिंमत असेल तर माझ्याकडे यावे, सर्वांची यादी देतो अस म्हणत भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आव्हान दिले आहे.

आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केले आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. जसे आपण पेरतो तसेच उगवतो. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन असे उदयनराजे यांनी म्हंटल. तसेच ‘कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. असे ते म्हणाले.

उदयनराजे भोसले यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना भाजपालाही घरचा आहेर दिला आहे. एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं अशा शब्दांत त्यांनी भाजपासहित इतर पक्षांवरही टीका केली. एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे एकमेकांचे काढत बसायचे. बास झाले आता राजकारण’, असे म्हणत उदयनराजे यांनी ठणकावले.

You might also like