मानसपुत्रांनी आजपर्यंत यशवंतरावांना भारतरत्न देण्याची मागणी का केली नाही?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी काही यशवंतराव चव्हाण (Yashwant Chavan) यांचा मानसपुत्र नाही. जे मानसपुत्र आहेत, त्यांच्याकडे सत्ता असताना, त्यांनी आजपर्यंत यशवंतराव चव्हाण याना भारतरत्न पुरस्काराची का मागणी केली नाही? असा सवाल करत भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. यंदा खासदार झाल्यानंतर उदयनराजे यांनी कराड येथील प्रीतिसंगमावरील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यावेळी उदयनराजे भोसलेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. मी मागणी केली नाही म्हणून विरोधक टीका करत असतील तर ज्यावेळी पुरस्कार मिळेल त्यावेळी कळेल. मी काही यशवंतराव चव्हाण यांचा मानसपुत्र नाही. जे मानसपुत्र आहेत, त्यांच्याकडे सत्ता असताना, त्यांनी आजपर्यंत पुरस्काराची का मागणी केली नाही? असा सवाल उदयनराजेंनी केला . अजित पवार गटाने आपल्या जाहीरनाम्यात आम्ही सत्ता येताच यशवंतराव चव्हाण याना भारतरत्न देऊ असं आश्वासन दिले होते, त्यानंतर हा भारतरत्न चा मुद्दा चर्चेत राहिला. तर दुसरीकडे शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र मानले जातात, त्यामुळे आत्तापर्यंत पवारांनी सत्ता असूनही यशवंतरावांना भारतरत्न का दिला नाही असा सवाल विरोधक करत असतात. नेमका हाच धागा पकडत उदयनराजेंनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली.

दरम्यान, यावेळी कराड शहरात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. सुरेश (बाबा) भोसले, भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, श्री. मदनराव मोहिते, श्री. विनायकबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, विक्रमजी पावसकर, लोकसभा समन्वयक श्री सुनील काटकर, कराड दक्षिण शिवसेना नेते श्री. राजेंद्र यादव, कराड दक्षिण विधानसभा निवडणूक प्रमुख धनाजी काका पाटील, श्री. राजेश पाटील, श्री. विजय यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.