हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून मिटलेला नाही. यावरून राज्यभर वातावरण तापलेल आहे. त्यात आता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार काय करत आहे हे मी पाहतोय. सरकारच्या भूमिकेवर मी योग्यवेळी बोलेन पण सपाटून बोलेन ,असा सूचक इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
उदयनराजेंनी मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष राजाराम सावंत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बांदा मराठा समाज मंडळाच्यावतीने त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यता आलं. माजी सरपंच सावळाराम सावंत यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर राजाराम सावंत आणि उदयनराजे यांच्यात अर्धातास चर्चा झाली.
यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हा इशारा दिला. मी फक्त योग्यवेळेची वाट पाहत आहे. योग्यवेळ येताच मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सपाटून बोलणार आहे, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजे पुन्हा आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, बांदा मराठा समाज मंडळाचे कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’