मला धक्के द्यायची सवय आहे, कधी कधी मी देतो आणि कधी कधी मलाही बसतात – खा.उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा | साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी आज सातारा शहरातील ग्रेड सेपरेटर चे अचानक उदघाटन करून सर्वांना धक्का दिला आणि याबाबत त्यांना विचारले असता मी आदत से मजबूर असून असे धक्के द्यायची मला सवय आहे आणि कधी कधी हे धक्के मी देतो आणि कधी कधी हे धक्के मला ही बसतात असे सांगायला ते विसरले नाहीत.

यावेळी उदयनराजे म्हणाले, सातारकरांसह माझ्यासाठी आज हा ऐतिहासिक क्षण असून लोकांची मागणी होती. पोवईनाक्यावर आठ रस्ते एकत्र येतात. तेथे वाहतूकची कोंडी होत होती. पर्यटक, व्यापारी व नागरीकांना त्रास सहन करावा लागत होता. सातारा विकास आघाडी पालिकेच्या सत्तेत आली.त्यावेळी नेहमीप्रमाणे आम्ही याबाबतच आश्वासन दिले होते. त्याची प्रत्यक्ष
कृती आम्ही केली आहे.

आम्ही जे बोलतो ते करून दाखविले असून यामुळेच लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. सातारच्या जनतेने आजपर्यंत ज्या विविध पदावर मला निवडून दिले. त्याची सुरवात नगरसेवक पदापासून झाली. कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष मंत्री, खासदार हे सर्व जनतेने दिलेल्या आशिर्वादामुळे झाले.

सर्व सामन्यासाठी हा रस्ता कधी सुरू होणार या बाबत बोलताना हिंदी चित्रपटातील अभि के अभि हा डायलॉग मारायला देखील ते विसरले नाही. या वेळी बोलताना खा .उदयनराजे यांनी कॉलर उडवत जशी इतरांच्या स्टाईल असतात तशी ही माझी स्टाईल आहे आणि मला कोणी शाबासकी देऊ अगर ना देऊ ही माझी पद्धत आहे. असं उदयनराजे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment