दिन दुबळ्यांची सेवा करत राहणार; उदयनराजेंचा वाढदिवसानिमित्त संकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी साता-यात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांनी त्यांच औक्षण केलं. या नंतर शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान च्या वतीनं जलमंदीर पॅलेस या ठिकाणी शिवगर्जना करत उदयनराजे यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर सातारा जिल्ह्यातील गरजु विध्यार्थ्यांना 2 लाख 75 हजार वह्यांच वाटपाचा शुभारंभ उदयनराजे भोलसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना लोकांची सेवा करणं हाच माझा संकल्प आहे असं उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे म्हणाले, लोकांची सेवा करणे हाच माझा नेहमीचा संकल्प राहिला आहे. जे स्वत:ला मदत करु शकत नाही अशा लोकांना मदतीचा हात देणं मी माझं कर्तव्य समझतो असं सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात केला पाहिजे तसंच तरुणांनी वेळ वाया न घालवता स्वतःच्या कुटुंबाकरता, उन्नतीकरिता आणि स्वतःच्या सत्कारणासाठी हा वेळ दिला गेला पाहिजे आणि आपलं भविष्य आपणच घडवलं पाहिजे असं खासदार उदयनराजे म्हणाले.

एकदा वेळ गेली कि ती परत येत नाही. Time and tides don’t wait for anyone त्यामुळे आपलं भविष्य आपणच घडवायला हवं, असा उदयनराजेंनी तरुणांना सल्ला देऊन म्हणाले, तरुणांनी थोरांची आत्मचरित्र वाचायला हवीत. त्यामधून आपल्या विचारांची व्यापकता वाढते, ती वाढली नाही तर प्रगती कशी करणार? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. आज विविध क्षेत्रे तरुणांसाठी पायघड्या घालून आहेत. आपल्या आवडीनुसार ते क्षेत्र निवडून करिअर करावं, असेही ते म्हणाले. Hot the fortune 500 read हे पुस्तक तरुणांनी वाचलं पाहिजे. त्यात अशी लोक आहेत, की त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केला आहे. त्यांचा तरुणांनी आदर्श घ्यावा.

दरम्यान, महाराष्ट्रातील गड, किल्ले याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. परदेशातही भरपूर पर्यटन स्थळे आहेत. परदेशात जाण्यापेक्षा आपल्या देशातच पर्यटन करावे. आपला भारत देश इतका विशाल आहे, की पर्यटनासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. सरकारने गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावा. गड किल्ल्यांचा विकास झाला तर देशातील पर्यटन वाढेल, असेही उदयनराजे म्हणाले.