हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीमध्ये अंतिम जागावाटप झालं नसलं तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या 20 उमेदवारांची संभाव्य यादी निश्चित केली आहे. यामध्ये काही महिन्यापूर्वी हत्या करण्यात आलेले अभिषेक घोसाळकर याना तिकीट देण्यात येण्याची शक्यता आहे तर कल्याण मधून दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. लोकमतने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सांगली लोकसभेसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच केली आहे. मात्र सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असून येथून विशाल पाटील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तर छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे यांच्या ऐवजी अंबादास दानवे याना तिकीट मिळू शकते. तस झाल्यास खैरे काय भूमिका घेतात ते पाहण सुद्धा महत्वाचे ठरेल. मुंबईत सुद्धा आपली ताकद पुन्हा एकदा दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. मुंबईत कमबॅक करण्यासाठी ठाकरेंनी सर्व ताकद पणाला लावली आहे. मुंबईतील सहापैकी पाच जागा ठाकरेंची सेना लढवणार आहे.
ठाकरेंकडून कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी? पाहा संभाव्य यादी
मुंबई उत्तर- तेजस्वी घोसाळकर
मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तीकर
मुंबई उत्तर पूर्व- संजय दीना पाटील
मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
मुंबई दक्षिण- अरविंद सावंतयवतमाळ-वाशिम- संजय देशमुख
कल्याण- केदार दिघे
ठाणे- राजन विचारे
हिंगोली- नागेश अष्टीकर
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
परभणी- संजय जाधव
रायगड- अनंत गीते
धाराशिव- ओमराजे निंबाळकर
सांगली- चंद्रहार पाटील
रत्नागिरी-सिंधुदुर्ग- विनायक राऊत
छ. संभाजीनगर- अंबादास दानवे
मावळ- संजोग वाघेरे
शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे
नाशिक- विजय करंजकर
पालघर- भारती कामडी