INDIA आघाडीचा पंतप्रधान कोण?? ठाकरे म्हणतायत आमचं ठरलंय!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडिया आघाडीचा (INDIA Alliance) पंतप्रधान कोण होणार याची चिंता नरेंद्र मोदी यांनी करू नये .. कोणाला पंतप्रधान करायचं याबाबत आमच ठरलय अशी मोठी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली. आज कॉग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विविध राजकीय मुद्द्यावरून त्यांनी भाजप आणि NDA आघाडीवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, इंडिया आघाडी हि देशाची लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी केली आहे. इंडिया आघाडीकडे भरपूर पंतप्रधान पदाचे चेहरे आहेत असं नरेंद्र मोदी म्हणतात याचा अर्थ त्यांनी मान्य केलं आहे कि त्यांचे सरकार येत नाही. आमच्याकडे चेहरा कोण हा प्रश्नच नाही… प्रश्न आहे तो म्हणजे भाजपकडे.. त्यांच्याकडं एकच चेहरा आहे तो पण आता चालत नाही. आमच्या इंडिया आघडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत. त्याबाबत काय करायचं हे आमच्या बैठकीत ठरलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानाने चर्चाना उधाण आलं आहे. (Uddhav Thackeray on INDIA Alliance PM)

दरम्यान, केंद्र सरकारला मुंबई तोडायची आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा यावर भाजपचा भर आहे, शासकीय यंत्रणांचा दुरूपयोग केला जातोय, मात्र आता 4 जूनला जुमला पर्व संपत आहे. 4 जूनला अच्छे दिनला सुरुवात होईल. अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी मोदींवर केली . आमचं सरकार आल्यावर मुंबई आणि महाराष्ट्रचा वैभव आम्ही परत आणू, आमचे सरकार आल्यावर आम्ही राम मंदिराचे अपुरे राहिलेले काम पूर्ण करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली . मोदी मला नकली म्हणतात म्हणून मी त्यांना बेअकली म्हणतो असे सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाही.

इंडिया आघाडी महाराष्ट्रात 46 जागा जिंकेल

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडी कमीत कमी 46 जागांवर विजय मिळवेल असा मोठा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे. सध्याचे वातावरण बघता आम्ही लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी कमीत कमी ४६ जागा जिंकू. याचा अर्थ विरोधकांना त्यांना शून्य जागा मिळतील असं मी बोलत नाही. काही ना काही त्यांना मिळेल परंतु आमची आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपाला हरवेल असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.