… म्हणून मी शरद पवारांबरोबर गेलो; ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray Sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण बनलं. मधल्या काळात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर दुसरा भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात घडला… यानंतर राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडल्या.. परंतु २०१९ पासून ते आजपर्यंत उद्धव ठाकरेंवर मात्र हिंदुत्व सोडल्याचा आणि भिन्न विचाराच्या पक्षांशी आघाडी केल्याचा आरोप होतो. खास करून भाजप आणि शिंदे गटातील नेते आजही त्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. परंतु आपण महाविकास आघाडीची स्थापना का केली? शरद पवार आणि काँग्रेस सोबत आपण का गेलो? याचा मोठा खुलासा आज ६ वर्षांनी उद्धव ठाकरेंनी केला आहे. भाजपच्या राजकारणात व्यक्तिगत द्वेष सूड होता म्हणूनच मी शरद पवारांसोबत गेलो असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हंटल आहे.

आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आली आहे. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपवर आसूड घेतला. मला प्रश्न पडला की मी डावा आहे की, उजवा आहे? दोन्ही हात आपलेच आहेत. त्यामुळे डावा, उजवा करण्याची गरज नाही. आम्ही सडलेल्या मानसिकतेविरोधात आहोत. आम्ही भाजपसोबत 25-30 वाया घालवली. शरद पवार साहेब आणि बाळासाहेब यांचं नात तर तुम्हाला माहीतच आहे, मतभेद टोकाचे होतेपण मैत्री त्यापलीकडची होती .. थोडक्यात काय तर त्यांच्यामध्ये मतभेद होते. शिवसेना आणि कम्युनिष्ठांमध्ये देखील प्रचंड संघर्ष झाला, पण राजकारणात व्यक्तिगत द्वेष सूड असता कामा नये, म्हणूनच शरद पवार, आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ शकलो असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला.

यावेळी उद्धव ठाकरेंनी जनसुरक्षा विधेयकावरून सरकारवर जोरदार घणाघात केला. जात -पात धर्म काही बघू नका, जो कोणी देशाविरोधात कारवाया करेल त्याला फासावर लटकवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. परंतु एकीकडे रोकड सापडली म्हणून वसईच्या पालिका आयुक्तांना अटक झाली. मग मंत्र्यांच्या घरी बॅगा दिसल्या तरी का अटक नाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.  या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील उपस्थित होते.