शिवसेना आमदार फुटीबाबत ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, तेव्हा मला…..

uddhav thackeray Shivsena rebel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।जून २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ४० आमदारांनी शिवसेनेतून (Shiv Sena Rebel) बंड करत महविकास आघाडी सरकार पाडलं आणि नंतर भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तास्थापन केल. यानंतर कोर्टातील लढाईनंतर शिंदे गट सुरक्षित झाला तसेच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे सुद्धा निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना दिले आहे. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आमदार फुटीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. आमदार जात असताना मला काय कळत नव्हतं का?? पण मी सडके आहेत त्यांना जाऊन दिल असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे २ दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी कणकवली येथील जाहीर सभेत बोलताना शिवसेनेतील बंडाबाबत भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, आमदार जात असताना मला काय समजत नव्हतं का?? मिंधेना दाढी पकडून आणता आले नसते का??पण जेवढे सडके आहेत त्यांना मी जाऊन दिले असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. एकप्रकारे शिंदेंच्या बंडाची ठाकरेंना चाहूल होतीच हे यातून स्पष्ट होते. मला संपवायला निघाले. हिंमत असेल तर या अंगावरअसं आव्हानही ठाकरेंनी विरोधकांना दिले.

नारायण राणेंवर निशाणा –

आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन सुपुत्रांचाही समाचार घेतला. “मी आज कोंबडी वडे खाल्ले. याच्यावर काय बोलणार, याची लायकी नाही असं म्हणत ठाकरेंनी राणेंना फटकारलं. पंतप्रधान मोदी म्हणतात, आम्हाला घराणेशाही नको, मग राणेंची घराणेशाही तुम्हाला कशी चालते?? . मागे पंतप्रधान म्हणाले होते. मैं दो तीन किलो गालिया खाता हूँ. मग हे तुमची दोन-तीन भोकं पडलेली. तीनपाट लोकं आम्हाला काय सकाळपासून गुलाबजामुन देतात?”, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.