उद्धव ठाकरेंना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं आमंत्रण दिलंच पाहिजे- गोविंदगिरी महाराज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । अयोध्येत राम मंदिर उभारणीला सुरुवात होणार असून येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील १५० जणांना निमंत्रण दिलं जाणार आहे. त्यासाठी कोणाला निमंत्रण द्यायचं याची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले पाहिजे, अशी भूमिका राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री गोविंदगिरी महाराज यांनी मांडली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गोविंदगिरी महाराज म्हणाले, “शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकवेळा भूमिका मांडली आहे. त्यांचे कार्य यामध्ये खूप मोठे असल्याने आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले पाहिजे. तसेच या भूमिपूजनामध्ये प्रत्येकाने घरी किंवा मंदिरात जाऊन पूजा करून सहभागी व्हावे” दरम्यान, फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment