हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी भाजपने मोठी शक्कल लढवली आहे. सध्या सुरु असलेल्या रमजानच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सौगत-ए-मोदी (Saugat e Modi) मोहीम राबवण्याची घोषणा केलीय. याअंतर्गत देशभरातील जवळपास ३२ लाख गरीब मुसलमानांना केंद्र सरकार सौगात ए मोदी’ किट देणार आहे. जेणेकरून ईद साजरी करण्यासाठी त्यांना कुठलीही अडचण होऊ नये. मात्र केंद्र सरकारच्या या मोहिमेवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. हिंदुत्व सोडलं बोंबलणारे टोपी घालून सौगात ए-मोदी वाटायला जात आहेत असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केलं. आम्ही हिंदुत्व सोडलं असं बोंबलणारे आता टोपी घालून सौगात ए-मोदी वाटायला जात आहेत. मुस्लिमांनी मते दिले तर सत्ता जिहाद म्हणायचे. आता ईद निमित्त सौगात हे मोदी हा कार्यक्रम भाजपने घेतला आहे. 32 हजार कार्यकर्ते हे वाटप करणार आहेत, पण हे सौगात ए सत्ता आहे. हा निर्लज्जपणा आहे. बटेगे तो कटेंगे म्हणणारे आता त्यांना सौगात ए-मोदीचे वाटप करणार आहेत. आता हे टोपी घालून सौगात कशी वाटायला जातात हे बघायचं आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हंटल.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मुस्लिमांच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आली तर पुरणपोळी द्यायची. आता जे उडाण टप्पू आहेत ते कसे टोपी घालून कसे जातात ते पाहा. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आऱोप करण्यापूर्वी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. सौगात हे सत्ता फक्त बिहार निवडणुकीच्यापूर्ती आहे की पुढे सुद्धा सुरु राहणार आहे असा सवाल करत भाजपने आता तरी हिंदुत्व सोडल हे सांगावं अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली…
दरम्यान, राज ठाकरेंच्या मनसे कडून प्रथमच बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला जात आहे. याबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी मनसेलाही सणसणीत टोला लगावला. आता सगळ्यांना कळतंय की बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. आता सगळेच पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरत आहेत. कारण, त्यांना कळते की या शिवाय पर्याय नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.




