कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – देशात सध्या सर्वत्र 15 ऑगस्टनिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक प्रकारचे कार्यक्रम होत् आहेत. महाराष्ट्रातही विविध पद्धतीने कार्यक्रम साजरे होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव या ठिकाणच्या कृष्णमाई जलतरण मंडळातर्फे (Krishnamai Swimming mandal) हा अमृत महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. आझादीचा महोत्सवनिमित्ताने आज 14 ऑगस्ट रोजी 15 ऑगस्टच्यानिमित्ताने हातात तिरंगा ध्वज घेऊन मंडळातील सदस्यांनी (Krishnamai Swimming mandal) हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमापासून ते उदगाव येथील कृष्णाघाटपर्यंत तब्बल 9 किलोमीटरचे अंतर 1 तास 10 मिनिटांमध्ये महापुरातून साहसी जलप्रवास करून पूर्ण करण्यात आले. यामध्ये मंडळाच्या (Krishnamai Swimming mandal) 22 जणांचा समावेश होता.
कोल्हापुरात कृष्णा नदीत 9 किलोमीटर पुरातून पोहत फडकविला तिरंगा pic.twitter.com/kJMp62oKNB
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 14, 2022
तिरंगा घेऊन नदीतून 9 कि.मी. प्रवास
या मंडळाकडून (Krishnamai Swimming mandal) या उपक्रमाबरोबरच बरोबर प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा घालून 700 ते 800 लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करणे तसेच मे महिन्यामध्ये बालवाडीपासून ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पोहण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. सद्या 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उदगाव येथील कृष्णमाई जलतरण मंडळानेही 9 किलोमीटर अंतरावर हातात तिरंगा घेऊन पोहत येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रविवारी पहाटे या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.
कृष्णमाई जलतरण मंडळाचे सदस्य आणि कार्यकर्ते
या मंडळामध्ये (Krishnamai Swimming mandal) राजू कलगुटगी, प्रा.सुनिल बनहट्टी, जयपाल मगदूम, गणेश पाचंगे, नितीन पाटील,तानाजी जाधव,महेश महाडिक, ऋषभ पाटील, विक्रम घाटगे, संतोष चुडाप्पा, कोळेकर अण्णा,बाळासाहेब चौगुले तसेच मंडळाच्या अनेक सदस्यांनी पुढाकार घेऊन पोहत तिरंगा फडकवत हरिपूरपासून उदगावपर्यंत आणला. हा उपक्रम पाहण्यासाठी नदीकाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???