मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड झाली.
उद्धव ठाकरे यांचा शपथविधी एक डिसेंबर रोजी शिवतीर्थ येथे पार पडेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ठाकरे घराण्यातील ते एकमेव व्यक्ती ठरतील. वीस वर्षानंतर राज्यात मनोहर जोशी व नारायण राणे यांच्या नंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील.
‘महाराष्ट्र विकास आघाडी’च्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख म्हणालेत, “३० वर्ष आम्ही ज्यांच्यासोबत मैत्री ठेवली त्या मित्रांनी विश्वास नाही ठेवला पण ज्यांच्याशी ३० वर्ष सामना केला, ते राजकीय विरोधक माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. मला आपल्या सगळ्यांच्या साथीची, सोबतीची, सहकार्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मला पुसायचे आहेत. माझं सरकार म्हणजे आपल्या सर्वांचे सरकार हे कुणाशीही सुडाने वागणार नाही.”
"मला आपल्या सगळ्यांच्या साथीची, सोबतीची, सहकार्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मला पुसायचे आहेत."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे pic.twitter.com/sDL4cu0xKW— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 26, 2019
उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतृत्व करतील असा प्रस्ताव मी मांडला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील निवडून आलेल्या सर्व आमदारांनी या ठरावाला पाठींबा दिला.
ठराव एकमताने संमत झाला !
अभिनंदन उद्धवजी !
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 26, 2019