जेव्हा उदयनराजे आणि अतुल भोसलेंना पण काढावा लागतो वडापावावर दिवस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रचाराला आता रंगत चढली आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेसुद्धा तयारीत असताना प्रचाराच्या घाई-गडबडीत दोन नेत्यांनी वडापाव खात आपली भूक भागवून घेतली.

महाराष्ट्रात शिवसेनेने कष्टकऱ्यांचं अन्न म्हणून मुंबई प्रांतात वडापाव प्रसिद्ध केला होता. मुंबईतील कर्मचारी वर्ग आणि सामान्य नागरिक किमान पोषणमूल्य असलेला वडापाव खात दिवस काढत होता, हे जुने जाणते लोक आवर्जून सांगतात. आता राजकीय नेत्यांनासुद्धा याचा प्रत्यय येत आहे.

कराड दक्षिणमधून अतुल भोसले पृथ्वीराज चव्हाणांविरुद्ध निवडणूक लढतायत, तर उदयनराजेंनाही लोकसभेसाठी कराड भागातील मतांची आवश्यकता आहे.अशा परिस्थितीत पायाला भिंगरी लावून हे दोन नेते प्रचार करत असून वडापाव खाऊनच उरली सुरली ऊर्जा ते टिकवून आहेत.

इतर काही बातम्या-