उजनीचा पाणी प्रश्न इस्लामपूरात जयंत पाटलांच्या दारी : घराकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचा पाणी प्रश्नांचा मुद्दा आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये आज पेटलेला पहायला मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरावर धडक देत आंदोलन करण्यासाठी आलेले होते. पाणी देऊ नये ही मागणी घेऊन समितीचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याची भूमिका घेऊन इस्लामपूर या ठिकाणी दाखल झाले होते.

मात्र आंदोलकांना पोलिसांनी साखराळे येथील साखर कारखान्यावर या कार्यकर्त्यांना अडवले. या दरम्यान कार्यकर्ते पोलिसांमध्ये किरकोळ वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या दारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. उजनी धरणातून इंदापूर आणि बारामती या ठिकाणी पाच टीएमसी पाणी देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याला विरोध म्हणून सोलापूर जिल्ह्यात उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन सुरू आहे.

मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याबाबत सर्वेक्षण करण्याचे दिलेले आदेश रद्द करण्यात आल्याचा आदेश मंत्री पाटील यांच्या स्वीय सहाय्यक यांनी आंदोलकांना दाखवला. त्यानंतर सुरू असलेले आंदोलन स्थगित करत सोलापूर जिल्ह्यातही पाणी संघर्ष समितीचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खापसे यांनी जाहीर केले.

Leave a Comment