हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ujjawla Yojana : देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत देण्यात येणारे 200 रुपये प्रति एलपीजी सिलेंडरचे अनुदान एक वर्षासाठी वाढवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,” आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समितीने PMUY च्या लाभार्थ्यांना देण्यात येणारे प्रति एलपीजी सिलेंडर 200 रुपयांचे अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. हे अनुदान वर्षाला 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरसाठी दिले जाईल. Ujjawla Yojana
हे जाणून घ्या कि, 1 मार्च 2023 पर्यंत, या योजनेअंतर्गत 9.59 लाभार्थी होते. अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की,” यासाठी 2022-23 मध्ये 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 मध्ये 7,680 कोटी रुपये खर्च होतील.” हे लक्षात घ्या कि, या योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान हे थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. Ujjawla Yojana
अनुराग ठाकूर असेही म्हणाले की,” जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किंमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजीच्या वाढत्या किंमतींपासून दिलासा देणे महत्त्वाचे आहे. PMUY अंतर्गत सबसिडीच्या स्वरूपात ग्राहकांना मिळणारा पाठिंबा त्यांना एलपीजीचा सतत वापर करण्यास प्रोत्साहित करतो. Ujjawla Yojana
PMUY चे उद्दिष्ट जाणून घ्या
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) चे उद्दिष्ट स्त्रिया आणि बालकांना स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन- LPG पुरवून त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे आहे.
उज्ज्वला योजना म्हणजे काय ???
उज्ज्वला योजनेअंतर्गत देशातील बीपीएल कुटुंबांना प्रत्येक एलपीजी कनेक्शनसाठी 1600 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. प्रति कनेक्शन 1600 रुपये प्रशासकीय खर्च, ज्यामध्ये एक सिलेंडर, प्रेशर रेग्युलेटर, बुकलेट, सेफ्टी होज़ इ. सामील आहेत. Ujjawla Yojana
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pmuy.gov.in/
हे पण वाचा :
Gold Price Today : देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीचे दर घसरले, पहा आपल्या शहरातील आजचे नवे दर
शिक्षणासाठी ‘या’ सरकारी बँकांकडून सर्वात कमी व्याजदराने मिळेल Education Loan
Ramgad : रत्नागिरी जिल्ह्यात सापडला नवीन किल्ला, याविषयीची सर्व माहिती जाणून घ्या
Ration Card शी आधार लिंक करण्याला मिळाली मुदतवाढ, जाणून घ्या त्यासाठी प्रक्रिया
Stock Market : आता भारतात बसून अशा प्रकारे अमेरिकन शेअर्समध्ये करा गुंतवणूक, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया तपासा