कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
बंकरमध्ये गेल्यावर पाणी आणि चिपसवर दिवस काढावे लागले. जेवण मिळत नाही, दुसरीकडे बाॅम्बनी आमच्या कानटाळ्या बसत होत्या. आता परत युक्रेनमध्ये जायचचं नाही. आम्ही आपल्या देशात आलो तेव्हा आम्हाला पुन्हा जन्म मिळाला असल्याचे थरारक अनुभव कराड येथे युध्दग्रस्त युक्रेनमधून परतलेली प्रतिक्षा अरबुणे हिने सांगितले.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/530801901676309
सातारा जिल्ह्यातील कराड येथील एक विद्यार्थीनी सुखरूप घरी परतली. त्यानंतर तिने आपल्या पालकांसोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेत आभार मानले. यावेळी तिने किव शहरातील भयानक युद्ध परिस्थितीतून भारतात परतण्याचा भयानक प्रवास सांगितला.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/530801901676309
मेस व बाजारपेठा बंद असल्याने खाण्यास काहीही मिळत नव्हेत, एक दिवस आम्ही केवळ पाण्यावर काढला. नंतर तिथे खाण्यासाठी चिपस मिळाले, परंतु ते आणण्यासाठी जाताना डोळ्यांनी आम्ही भयानक परिस्थिती पहात होतो. तिथे इतर कोणतीही प्रकारची व्यवस्था होती. अखेर आम्ही मुलांनी धाडस करून ग्रुपने तेथून बाहेर पडून बाॅर्डरवर जाण्याचा निर्णय घेतला. तिथे कडाक्याची थंडी मायनस (- 5) अंश सेल्सिअस होते. रशिया आणि युक्रेन देशातील सैन्यातील फायरिंगचा जोराचा आवाज येत होता. त्यामुळे आता परत आपला देश सोडून जायची इच्छा अजिबात नसल्याची प्रतिक्षाने सांगितले.