उंब्रज पोलिसांचा कारवाईचा धडाका : अवैध धंद्यावरील 8 ठिकाणच्या छाप्यात 23 गुन्हे दाखल

Umbraj Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील उंब्रजसह परिसरात पोलिसांनी विविध ठिकाणी अवैध धंद्यांवर धाडी टाकण्याचे छापा सत्र केले. या कारवाईत पोलिसांनी 8 ठिकाणी छापा टाकून एकूण 58 हजार 755 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला. पोलिसांनी या कारवाईत 23 गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशानुसार कारवाई सत्र राववण्यात आले आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रज पोलिसांनी 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या काळात विविध ठिकाणी केलेल्या अवैध दारू विक्रीप्रकरणी उंब्रज पोलिस ठाणे हद्दीतील संशयास्पद विकास जयवंत चव्हाण (रा. कालगाव), दिगंबर संपत चव्हाण (रा. उंब्रज), अमोल सर्जेराव सोनावले (रा. पाल), राजू बबन सोनावले (रा. चरेगाव), शौकत मुबारक मुलाणी (रा. पेरले), नवनाथ बबन पवार (रा. मसुगडेवाडी), हणमंत प्रल्हाद थोरात (रा. नडशी), सुहास शंकर भिंताडे (रा. जाळगेवाडी), दीपक आनंदराव माने (रा. चरेगाव), रवी श्रीरंग काटे (रा. चाफळ), प्रसाद गजानन खेडेकर (रा. शहापूर), राहुल सोन्याबा सोनावले (रा. कोंजावडे) यांच्यावर कारवाई करून 15 गुन्हे दाखल करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 58 हजार 336 रुपयांचा अवैध दारूचा माल जप्त करून त्यांचेवर कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

उंब्रज पोलिस ठाणे हद्दीत जुगार खेळणाऱ्या संभाजी बाबूराव सूर्यवंशी, अनिल आनंदराव सूर्यवंशी, मानसिंग मारुती सूर्यवंशी, भगवान मधुकर काळे, जनार्दन बाबूराव सूर्यवंशी, संजय शिवराम सूर्यवंशी (सर्व- रा. पेरले), भगवान खाशाबा पाटसुते (रा. मसूर), दादासो बळवंत जाधव, भानुदास लक्ष्मण जाधव, गजानन बाळकृष्ण जाधव, दादासो निळकंठ पवार, हणमंत नारायण जाधव, नारायण शंकर जाधव, नवनाथ युवराज जाधव, संजय गणपत क्षरसागर, राजेंद्र रामचंद्र जाधव (सर्व- रा. तारळे), तानाजी किसन सकपाळ, सुरेश तात्याबा सपकाळ, शंकर ज्ञानू सकपाळ, सर्जेराव रामचंद्र सकपाळ, विठ्ठल तुकाराम सकपाळ (सर्व- रा. वरची केळवली), सदाशिव जिजाबा भोसले, दादासो बाबू भोसले, मोसीम मुबारक मोमीन, सुनील बापू शेलार (सर्व- रा. कोंजावडे), सिकंदर वजीर डांगे (रा. चरेगाव ता. कऱ्हाड), आबासो धोंडिराम गोसावी (रा. चरेगाव), बबन बाळू मोरे, संभाजी बबन माळी,विक्रम बळिराम लोहार, संदीप रामचंद्र भांदिर्गे, महादेव रामचंद्र खरात, नितीन भीमराव सरगडे, वाहिद इसाक मोमीन, दीपक अशोक नागे (सर्व- रा. तारळे, ता. पाटण) यांच्यावर एकूण 8 छापे टाकून त्यांच्या ताब्यातून सुमारे 58 हजार ७५५ रुपयांच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

उंब्रज पोलिसांनी ही कार्यवाही पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या पथकाने केली आहे.