इन्शुरन्सचे पैसै मिळविण्यासाठी डंपर चोरीचा बनाव उघडकीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

डंपर चोरीला गेल्याचा बनाव करून विमा कंपनीकडून पैसे मिळवण्याचा कट रचणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. यामध्ये डंपर मालक विजय कदम त्याचा मित्र संतोष साळुंखे (दोघे रा. नागठाणे), नेताजी निंबाळकर (रा. मांडकी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता ते 23 सात 2022 सकाळी साडेआठ पर्यंत नागठाणे (ता. सातारा) येथून डंपर चोरीला गेल्याची तक्रार मालक विजय रामचंद्र कदम यांनी बोरगाव पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. सदर गुन्हा तपासला जाण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे गुन्हे शाखेने आपली तपासाची सूत्रे गतिमान केली होती. सदरचा गुन्हा कराड येथील या इनामदार (रा. सोमवार पेठ) यांनी केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यांनी तपास पथकास त्याच ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या. या पथकाने कराड येथून इनामदार याला ताब्यात घेतले. तेव्हा पुण्यातील फिर्यादी यांच्या डंपर मालकाचे कर्जाचे हफ्ते थकले होते व फिर्यादीला यांना पैशाची गरज होती. त्याकरता डंपर चोरीला गेल्याचा बनाव करून इन्शुरन्सचे पैसे क्लेम करून मिळवायचे आणि चोरीला डंपर त्यांच्या ओळखीचे नेताजी निंबाळकर यांच्या ताब्यात द्यायचा आणि विम्याचे पैसे वाटून घ्यायचे असा कट शिजल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. विजय कदम, संतोष साळुंखे, नेताजी निंबाळकर यांना पोलिसांनी कौशल्याने विचारपूस केली. त्यांनी देखील सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.

इन्शुरन्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी चोरीचा बनाव करून लपवून ठेवलेल्या 3 लाख 40 रुपये किमतीचा डंपर आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. तिघा आरोपींना बोरगाव पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. या तपासात पोलिस मंदार उत्तमराव दबडे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, संतोष पवार, आतिश गाडगे, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे यांनी तपासात भाग घेतला होता.