प्रतिनिधी सांगली | प्रथमेश गोंधळे
नात्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिश दाखवून तिच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश भरमु हाके असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादी वरून युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी हि राजेश हाके याच्या नात्यातील आहे. तो सेंट्रिंग कामगार म्हणून काम करतो. नात्यातील मुलगी असल्याने तिच्या घरी त्याचे सारखे येणे – जाणे होत असे. त्यातूनच त्या मुलाने मुलीला प्रेमाच्या जाळयात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
गेल्या दोन महिन्यांपासून त्याने तिच्यावर अत्याचार केले. वासनांध आरोपीने मात्र नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर आज पीडित मुलीने त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्यासार त्याच्यावर बलात्कारासह लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.