हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील जनतेला योग्य उपचार सेवा अगदी मोबलक दरात मिळावी, यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला एक मोठे आश्वासन दिले आहे. या आश्वासनामध्ये सावंत यांनी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दंत वैद्यकीय उपचारांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. असे झाल्यास जनतेला दातांचे उपचारही (Dental Treatment) मोफत घेता येतील.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना मुंबई पुणे आणि इतर शहरातील खासगी रुग्णालयातही लागू करण्यात येणार आहे. याकरता डेलिगेशन रुग्णालयांना भेट देण्यात येणार आहे. ही योजना लागू झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात दातांचे मोफत उपचार घेता येतील. यामुळे या उपचारासाठी अधिक पैसे मोजावे लागणार नाही. सत्यजित तांबे यांनी सभागृहात माहिती दिली की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाखांपैकी केवळ 1.5 लाख रुपये विमा कंपनी देणार आहे . उर्वरित 3.5 लाख रुपयांची हमी राज्य सरकार घेणार आहे.
दरम्यान, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महाराष्ट्रातील गरीब लोकांच्या उपचाराची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. या योजनेअंतर्गत जनतेला १ जुलैपासून ५ लाखांपर्यंतचं विमा संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे त्याचा मोठा फायदा जनतेला होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे आता याच योजनेअंतर्गत दातांवरील उपचार देखील मोफत घेण्याची सुविधा सुरू होणार आहे.