मुंबईकरांसाठी आता एक खुशखबर आहे. तुम्हाला जर ऑफिस च्या कामासाठी लोकलचे धक्के खात जावे लागत असेल तर त्यातून तुमची सुटका होणार आहे. कारण मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या कुलाबा ते आरे मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन शनिवार म्हणजेच उद्या दिनांक 5 ऑक्टोबर रोजी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. तर रविवारपासून ही मेट्रोमार्गिका नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे.
खरंतर कुलाबा ते आरे हा 33.5 किलोमीटरचा मार्ग आहे. मात्र पहिल्या टप्प्यात 12.4 किलोमीटरचा मार्ग खुला होणार आहे. या पहिल्या टप्प्यात प्रत्येक मार्गावर 6.40 मिनिटाच्या अंतरावर गाडी चालवली जाणार आहे. कुलाबा ते आरे या मार्गावर एकूण 27 स्थानके असणार आहेत मात्र पहिल्या टप्प्यामध्ये त्यातील दहा स्थानक खुली करण्यात येणार आहेत. तुम्ही सुद्धा लोकलच्या धक्काबुक्कीला कंटाळून गेला असाल तर तुमच्यासाठी मेट्रो ही एक उत्तम सुविधा ठरणार आहे. तुम्हाला जर चिंता वाटत असेल मेट्रोचे तिकीट किती असणार तर काही काळजी करू नका कारण मेट्रोचे तिकीट कमी असून हे अवघ्या दहा रुपयांपासून सुरू आहे. आता कोणत्या मार्गे केवळ किती रुपये आकारले जाणार आहेत हे पाहुयात….
काय असेल तिकीट दर ?
तुम्हाला जर संपूर्ण आरे ते बीकेसी असा प्रवास करायचा असेल तर पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत. आरे जे व्ही एल आर ते मरोळ नाक्यापर्यंतच्या अंतरासाठी 20 रुपये तिकीट दर आहे. तर आरे ते जे व्ही एल आर स्थानकापासून विमानतळ टी 1 टर्मिनल स्थानकापर्यंत 30 रुपये भाडं आकारले जाणार आहे. याशिवाय वांद्रे कॉलनी स्थानकापर्यंत प्रवाशांना चाळीस रुपये मोजावे लागणार आहेत.
सीप्झ- 10 रुपये
एमआयडीसी अंधेरी-20
मरोळ नाका-20
सीएसएमआयए टी2-30
सहार रोड- 30
सीएसएमआयए टी1-30
सांताक्रुझ-40
वांद्रे कॉलनी-40
बीकेसी-50
या स्थानकांचा समावेश
रविवार पासून सुरु होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांमध्ये आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, आंतराराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2, सहार रोड, विमानतळ टर्मिनल 1, सांताक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी या स्थानकांचा समावेश असणार आहे.