नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. बहुतेक लोकांना आर्थिक सर्वेक्षण समजलेले नाही. मात्र आता अर्थ मंत्रालयाने ते समजून घेण्यासाठी एक मार्ग शोधला आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही सामान्य नागरिकाला ते सहज समजू शकेल.
अर्थ मंत्रालयाने आर्थिक सर्वेक्षणात ‘थालीनॉमिक्स’ समाविष्ट केले आहे. याच्या मदतीने तुम्हांला महागाई वाढली की कमी झाली हे सहजपणे समजू शकेल. चला तर मग जाणून घेऊयात थालीनॉमिक्स म्हणजे काय आणि ते महागाईच्या पातळीवरून कसे ओळखले जाते…
“थालीनॉमिक्स” म्हणजे काय ?
“थालीनॉमिक्स” ही एक पद्धत आहे ज्याद्वारे भारतातील अन्न परवडणारी क्षमता ओळखली जाते. म्हणजेच एका भारतीयाला थाळी खाण्यासाठी किती खर्च करावा लागतो, हे थालीनॉमिक्समधून कळते. अन्न ही सर्वांची मूलभूत गरज आहे. खाण्यापिण्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांवर पडतो. थालिनॉमिक्स म्हणजे एका सामान्य व्यक्तीने प्लेटसाठी दिलेले पेमेंट मोजण्याचा प्रयत्न.
प्लेटची किंमत कशी ठरवली जाते ?
आर्थिक सर्वेक्षणात व्हेज आणि नॉनव्हेज थाळीच्या किमतींची माहिती देण्यात आली आहे. कोणती प्लेट महागली आहे आणि कोणती प्लेट स्वस्त झाली आहे. भारतातील फूड प्लेटच्या थालीनॉमिक्सच्या आधारे केलेल्या पुनरावलोकनात पौष्टिक थाळीच्या किमतीच्या आधारे निष्कर्ष काढण्यात येतो. या अर्थशास्त्राच्या माध्यमातून भारतातील एका सामान्य व्यक्तीच्या ताटाच्या किमतीचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो.