शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे – मकरंद पाटील

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहात तीन तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आमदार मकरंद पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी “पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना नदी, नाले, ओढे, रस्ते यांच्या दुरुस्तीसाठी काम एक फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. एक ही दिवस वाया न घालविता सर्वांनी प्रामाणिकपणे जबाबदारीने काम करावे,” असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.

महाबळेश्वर येथे पार पडलेल्या बैठकीस महाबळेश्वरच्या तहसिलदार सुषमा चौधरी पाटील, वाईचे तहसीलदार रणजित सिह भोसले, खंडाळा तालुका तहसीलदार दशरथ काळे, पं. स.सभापती संजय गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक राजूशेठ राजपुरे, महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ, वाई चे गटविकास अधिकारी नारायण घोलप, महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, वाईच्या वन क्षेत्रपाल स्नेहल मगर, सा.बां.खात्याचे उपविभागीय अभियंता महेश गोंजरी तसेच तिन्ही तालुक्याचे संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले की, शेती क्षेत्र दुरुस्तीकेली जाईल. या मशिनरीना इंधन पुरवठा करण्यासाठी सातारा जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली असून ते सुमारे दिड लाख लिटर इंधन पुरविणार आहेत. त्यामुळे एक ही दिवस वाया न घालविता सर्वांनी प्रामाणिक पणें काम करावे. महाबळेश्वर तहसीलदारांनी योग्य नियोजन करावे, एक फेब्रुवारीपासून कामाची सुरुवात होणार आहे.