19 मजली इमारतीवरून पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; आईला शोधत गेली होती खिडकीत, अन पुढे…

Mumbai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विरार पश्चिम भागात असलेल्या एका 19 मजली इमारतीवरून चार वर्षांची चिमुकली खाली पडल्यामुळे तिचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकुलत्या एक मुलीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना विरार पश्चिम येथे असलेल्या बचराज नावाच्या 19 मजली इमारतीत घडली आहे. चिमुकलीची आई पतीला सोडवण्यासाठी स्टेशनवर केली असतानाच याचं वेळेत खिडकीतून डोकावून पाहताना तिचा तोल गेल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या 19 मजली इमारतीत चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये जयालयन कुटुंब राहते. त्यांना चार वर्षीय दर्शनी नावाची मुलगी एकुलती एक होती. काल सकाळी दर्शनीची आई तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी स्टेशनवर गेली होती. यावेळी दर्शनी झोपली असल्यामुळे आईने तिला उठवले नाही. तसेच आपण लगेच परत येऊ या विचाराने ती कशीच निघून गेली. मात्र याच वेळेत झोपलेल्या दर्शनीला जाग आली. यानंतर ती आपल्या आईला शोधू लागली. अखेर आई कुठेच दिसत नसल्यामुळे ती बेडरूममधील खिडकी जवळ गेली. मात्र खिडकीतून बाहेर वाकून पाहत असताना दर्शनीचा तोल गेला आणि ती खाली पडली. उंचावरून पडल्याने दर्शनीचा जागीच मृत्यू झाला.

या सर्व घटनेमुळे विरार परिसरात खळबळ माजली आहे. तसेच, जर दर्शनीची आई तिला सोडून बाहेर गेली नसती तर दर्शनी जिवंत असती. असे देखील म्हटले जात आहे. या सर्व घडलेल्या प्रकारानंतर जयालयन कुटुंबाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दर्शनीच्या आई वडिलांनी दर्शनीचे डोळे दान केले आहेत. मात्र एकुलती एक मुलगी गमावल्याच्या धक्क्यातून अजून जयालयन कुटूंब बाहेर आलेले नाही.