हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Union Bank Of India: RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Union Bank Of India ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
17 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू
Union Bank Of India चे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू होतील. 17 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर, आता बँक कडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 3.00% ते 6.70% पर्यंत तर 599 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 7% पर्यंत व्याजदर मिळेल.
Union Bank Of India चे नवीन व्याज दर
आता बँक 7 ते 45 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 3.00% तर 46 ते 90 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.05% व्याज दर देतील. त्याच बरोबर 91-120 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.30% आणि 121-180 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.40% व्याज दर मिळेल.
तसेच आता बँकेकडून 181 दिवस ते एका वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील 5.25%, एका वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील 6.30%,1 वर्ष ते 443 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 6.60%, 444 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 6.70%, 445 दिवस ते 598 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 6.60% तर 599 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 7.0% व्याज दर मिळेल.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. Union Bank Of India
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Union Bank Of India
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://groww.in/fixed-deposit/union-bank-of-india-fd-interest-rates
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर