Union Budget 2024 | 2024 चा अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै 2024 रोजी सादर करणार आहे. मोदींच्या या अर्थसंकल्पावर देश आणि जगाच्या नजरा देखील आहेत. परंतु या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) नक्की काय होईल होणार आहे. त्याचप्रमाणे कोणती पदे निराशाजनक होतील आणि कोणत्या क्षेत्रांना चालना मिळेल? हे पाहणे बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष देखील यावर्षीच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेले आहे.
यावर्षी पीएम मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे. त्यानंतरच त्यांनी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता जारी करण्यात या फाईलवर देखील सही केलेली आणि काही दिवसातच शेतकऱ्या बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता देखील मिळाला. परंतु आता या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) शेतकऱ्यांना सरकारकडून आणखी जास्त अपेक्षा आहे. यावेळी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हा 6000 ऐवजी 8 हजार रुपये वार्षिक होईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
पीएम किसान योजना | Union Budget 2024
शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपये दिले जातात, ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावर पाठवली जाते. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. आता शेतकऱ्यांना वर्षाला आठ हजार रुपये दिले जातील, अशी अपेक्षा आहे. हे पैसे शेतकरी शेतीसाठी घेतात.
कृषी उपकरणांवर सवलत
शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवर सूट मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. उपकरणांवर लावण्यात आलेल्या जीएसटीविरोधात शेतकरी संघटना सातत्याने आंदोलन करत आहेत. त्यानंतर आता उपकरणांवर कमी GST दर किंवा अधिक सबसिडी मिळण्याची आशा आहे.
कमी व्याजात जास्त पैसे | Union Budget 2024
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कृषी कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली जाऊ शकते. सध्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज 7% व्याजदराने मिळते, ज्यामध्ये 3% सबसिडीचा समावेश आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना हे कर्ज ४ टक्के व्याजदराने मिळते. महागाई आणि कृषी खर्चात वाढ पाहता सरकार कर्ज मर्यादा वाढवू शकते.