Union Budget 2024 | Income Tax बाबत सरकारच्या 2 मोठ्या घोषणा!! तुमच्यावर काय परिणाम होणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Union Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग तिसऱ्यांदा NDA इंडिया सरकारचा आर्थिक अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेली आहेत. हा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या इन्कम टॅक्स लॅब (Income tax lab) विषयी एक घोषणा केलेली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार आता जुन्या प्रणालीनुसार कर भरणाऱ्या लोकांसाठी कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नसणार आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यांची ही घोषणा नोकरदार वर्गासाठी खूप महत्त्वाची घोषणा आहे. नव्या कर प्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदारांचे आता जवळपास 17 हजार 500 रुपये वाचणार आहेत.

तसेच निर्मला सीतारामन यांनी केलेल्या नव्या करप्रणाली स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा ही आता 50 हजारांवरून 75 रुपये एवढी करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास 25 हजार रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन वाढवण्यात आलेला आहे. तसेच फॅमिली डीडक्शनची मर्यादा 15000 वरून 25 हजार रुपये एवढी वाढवण्यात आलेली आहे.

नव्या करप्रणालीनुसार (Union Budget 2024) किती रक्कम भरावी लागेल. 3 लाख रुपयांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कर लागणार नाही. त्याचप्रमाणे 3 लाख ते 7 लाख रुपये दरम्यान 5 टक्के कर कर्ज त्याला भरावा लागणार आहे. तसेच 7 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी 10 टक्के कर भरावा लागणार आहे. तसेच 10 लाख ते 12 लाख उत्पन्नावर 15 टक्के कर भारावा लागणार आहे. त्याचप्रमाणे निर्मला सीतारामन यांनी केलेल्या नवीन घोषणेनुसार आता 12 लाख ते 15 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना 20 टक्के कर भरावा लागणार आहे. तसेच 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांना 30 टक्के एवढा कर भरावा लागणार आहे.