हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | याआधी केंद्र सरकारने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे धोरण अवलंबले होते. परंतु आता या धोरणात बदल केलेला असून सरकारने सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द केलेले आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. ही सूचना केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळा केंद्रद्वारे चालवल्या जाणार 3000 पेक्षा अधिक शाळांना लागू होणार आहे. जर एखादा विद्यार्थी नापास झाला, तर त्याला पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. परंतु जर तो दुसऱ्यांना देखील नापास झाला तर त्याला पुन्हा त्याच इयत्तेत बसावे लागणार आहे. परंतु विद्यार्थी नापास झाला तरी आठवीपर्यंत विद्यार्थ्यांचे नाव शाळेतून काढले जाणार नाही, असे सरकारने सांगितलेले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि आता नो डिटेन्शन पॉलिसी संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. येत्या काळात सुरू केलेल्या या व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या निर्णयानंतर पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलने बंद केले जाणार आहेत. या निर्णयामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल असे देखील सांगण्यात आलेली आहे.
या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता वाढेल आणि अकॅडमी परफॉर्मन्स देखील सुधारेल अशी माहिती शिक्षण मंडळांनी दिलेली आहे. या पॉलिसीवर खूप काळापासून चर्चा चालू होती. परंतु अखेर आता या या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पाचवी आणि आठवीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. परंतु त्यांना शाळेतून काढले जाणार नाही.