आता अग्निवीरांना आसाम रायफल्स भरतीमध्ये 10 टक्के आरक्षण : केंद्रीय गृह मंत्रालयाचा आणखी एक मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने नुकतीच महत्वपूर्ण अशी अग्निपथ योजनेची घोषणा केली. दरम्यान या योजनेबाबत देशभरातील युवकांकडून रस्त्यावर उतरत विरोध केला जात असताना केंद्रीय गृह मंत्रालयाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. “अग्निपथ योजने अंतर्गत सेवेत 4 वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी 10 टक्के रिक्त जागा राखीव ठेवली जाणार आहे. अग्निवीरांना दोन दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा 3 वर्ष वयाची सूट दिली जाईल, असा निर्णय आज गृह मंत्रालयाने ट्विटद्वारे जाहीर आहे.

केंद्र सरकारने लष्करभरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेतील तरुणांनाही वयोमर्यादा वाढविण्याबरोबर आज गृह मंत्रायलयाने एक नवीन निर्णय घेतला. आज केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, केंद्रीय गृह मंत्रालयाने आज अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी 10 टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये भरतीसाठी इच्छूक अग्निवीरांना उच्च वयोमर्यादेच्या पलीकडे अतिरिक्त 3 वर्षांची सूट देखील जाहीर केले आहे.

नेमकी अग्‍निपथ भरती योजना काय आहे?

केंद्राच्या अग्निपथ योजनेंतर्गत यावर्षी 46 हजार तरुणांना सशस्त्र दलात सामील करून घेतले जाणार आहे. या योजनेनुसार तरुणांची चार वर्षांसाठी भरती करून त्यांना ‘अग्नवीर’ असे म्हटले जाईल. अग्निवीरांचे वय 17 ते 21 वर्षे असेल, तसेच पगार 30 ते 40 हजार दरमहा असेल. या योजनेनुसार भरती झालेल्या तरुणांपैकी 25 टक्के तरुणांना सैन्यात पुढील संधी मिळणार असून उर्वरित 75 टक्के तरुणांना नोकरी सोडावी लागणार आहे.

Leave a Comment