हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : उच्च न्यायालयाने नाशिक पोलिसांना राणेंवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई न करण्याचे आदेश दिले. मुंबई न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली. “माझ्या विरोधात जे कोर्टाने निकाल दिले असल्याने एकच गोष्ट लक्षात येते की, या देशात कायद्याचे अजून राज्य आहे. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. त्यांना आंदोलने करायचे आहेत, आमचा बंदोबस्त करायचा आहे ते करू दे. मी कुणालाही घाबत नाही आणि घाबरणारही नाही. मी टीका करणार मात्र चांगल्या शब्दात,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मंत्री राणे म्हणाले की, मी त्यावेळी जे बोललो कारण माझ्या मनात देशाबद्दल अभिमान मनात होता म्हणून मी बोललो. आणि शिवसेना नेते काय बोलले? मुख्यमंत्री महाशय एका कार्यक्रमात म्हणाले कि थोबाड फोडेन? मुख्यमंत्री योगींना थोबाड फोडण्याची भाषा योग्य आहे का? शरद शरद पवार काय हा सज्जनपणा आहे. एवढं बोलणाऱ्याला मुख्यमंत्री करणं योग्य आहे का? मी जे काय बोललो त्यानंतर चिपळूणला काय झाले ते पहिले. त्यांना आंदोलने करायचे आहेत, आमचा बंदोबस्त करायचा आहे ते करू दे. एवढंच आठवणीत ठेवा. तुम्ही कोणी मला काही करु शकत नाही. तुमच्या कुठल्याच प्रक्रियेला मी घाबरत नाही. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. त्यावेळी आताचे कुणी नव्हते.
यावेळी मंत्री राणे म्हणाले की, मी जे काही शब्द वापरले त्याबाबत आता कोर्टानेही सांगितले आहे. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी जे शब्द वापरले ते योग्य आहेत का? माझं कुणी काहीच करू शकत नाही. मी पहिल्याना मंत्री झाल्याने मला लोकांचा आशीर्वाद हवा होता. म्हणून प्रधानमंत्री मोदींच्या आदेशानंतर मी जन आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. ती यापुढेही सुरु राहणार आहे.