औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेत आता शिवसेना-भाजप युती नको आहे. भाजप ११५ जागांवर स्वबळावर लढेल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी विश्वास व्यक्त केला. आज रविवारी (ता.१९) मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थान गणपती येथे गणरायाचे विसर्जन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कराड म्हणाले, की येणारा महापौर हा भाजपचाच असेल. महापालिका निवडणुकीसाठी युती करायची की हे उद्धव ठाकरे ठरवतील, अशी भूमिका शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रसंगी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.
शुक्रवारी (ता.१७) औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजी-माजी आणि भविष्यात बरोबर आली तर भावी सहकारी असे भाष्य केले होते. त्यावरुन राज्यात भाजप- शिवसेना युतीच्या चर्चेला उधाण आले होते.