हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अनेक मंदिरे श्रद्धेच्या प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहेत, पण पुण्यात एक अनोखे मंदिर आहे, जिथे अगरबत्तीच्या ऐवजी सिगारेट पेटवली जातात . हे मंदिर आहे, पुण्यातील शंकर महाराजांचा मठ, जो भक्तांना आपल्या अनोख्या पद्धतीसाठी ओळखला जातो. या ठिकाणी अगरबत्ती न लावता सिगारेट लावण्याची का पद्धत आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर चला या अनोख्या मंदिराविषयी माहिती पाहू.
संत शंकर महाराजांच्या भक्तांचे मोठे श्रद्धास्थान –
धनकवडी भागातील शंकर महाराजांच्या मठात, भक्त शंकर महाराजांच्या स्मृतीला आदर दाखवण्यासाठी सिगारेट अर्पण करतात. हे मंदिर संत शंकर महाराजांच्या भक्तांचे मोठे श्रद्धास्थान आहे, जिथे लाखो लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी येतात. तसेच हे एक महान योगी होते आणि त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान आजही अनेक भक्तांच्या जीवनात मार्गदर्शन करत आहे. त्यांचा जन्म 1800 च्या सुमारास मंगळवेढा येथे झाला. श्री शंकर महाराज हे नाथ सिद्ध परंपरेतील गुरु होते आणि आधुनिक काळातील महान योगी संतांपैकी एक मानले जातात.
महाराजांना सिगारेट ओढायला आवडायचे –
शंकर महाराजांच्या मठात सिगारेट अर्पण करण्याची परंपरा त्यांच्याशी संबंधित आहे. शंकर महाराजांना सिगारेट ओढायला आवडायचे, आणि यामुळेच त्यांच्या भक्तांना त्यांच्या इच्छेप्रमाणे सिगारेट अर्पण करण्याची परंपरा आहे. शंकर महाराजांनी सदैव ‘सिद्धीच्या मागे लागू नका’ असे सांगितले होते, आणि त्यांच्या साधना आणि तत्त्वज्ञानामुळे त्यांना “सिद्ध पुरुष” म्हणून ओळखले जाते. मठात येणारे भक्त या परंपरेला अत्यंत श्रद्धेने मानतात.