कराडतील हिंदू- मुस्लिम समाजातील ऐक्य दिशादर्शक :बी. आर. पाटील

कराड | शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. कराड शहरात हिंदू- मुस्लिम समाजातील ऐक्य नेहमीच पहायला मिळाले आहे. कराड शहराचा आदर्श राज्याला दिशाला देणारा अनेकदा ठरलेला आहे. भविष्यात येणारे सण शांततेत साजरे करावेत, पोलिसांचे सहकार्य सर्वांना राहील. मात्र चुकीच्या कोणत्याही गोष्टींना पाठिंबा दिला जाणार नाही. तेव्हा नवरात्र आणि ईद सामाजिक सलोखा ठेवून साजरी करावी, असे आवाहन कराड शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले आहे.

येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात (टाऊन हॉल) येथे दुर्गादेवी मूर्ती विसर्जन व ईद- ए- मिलाद सण शांततेत पार पाडण्यासाठी कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवरात्र तरूण मंडळाचे अध्यक्ष व मुस्लिम बांधव यांची बैठक पार पडली. या बैठकीस मलकापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नीलिमा येडगे, कराड नगर परिषदेचे विद्यमान नगसेवक विनायक पावसकर, सौरभ पाटील, फारुख पटवेकर, विजय वाटेगावर, तसेच साबिरमिया मुल्ला, राजू कासम मुल्ला, हरून तांबोळी मजीद अंबेकरी, सोहेल पटेल, दादा शिंगण, तसेच या प्रमुख मुस्लिम बांधवसहित सर्व पोलीस पाटील आणि मंडळाचे कार्यकर्ते असे ऐकून 40 ते 50 जनसमुदाय उपस्थित होता.

यावेळी नवरात्र मंडळाचे पदाधिकारी व मुस्लिम बांधवांनी सूचना मांडल्या. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्याचे ग्वाही दिली. तसेच नवरात्र मंडळे शांततेत विसर्जन मिरवणूक काढणार आहेत. तर ईदही घरगुती पध्दतीने साजरी करण्याचे आवाहनास मुस्लिम बाधवांनी प्रतिसाद दिला.

You might also like