विधानसभा निवडणूकींमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे; जाणून घ्या नवी तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणूक चालू आहेत. आज म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे विद्यापीठातील अनेक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर नेमले होते. यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म देखील वेळेत अपलोड होऊ शकले नाही. अशातच आता निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतलेला आहे.

पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा या ऑक्टोबरमध्ये नियोजित करण्यात आलेली होती. परंतु आणि कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलून 26 नोव्हेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु नंतर इलेक्शन ड्युटी लागल्यामुळे अनेक शिक्षक या इलेक्शन ड्युटीमध्ये गुंतलेले होते. आणि त्यामुळे परीक्षा आणखी 15 दिवस पुढे ढकलण्यात आलेल्या आहे. परीक्षांची नवी तारीख जाहीर केलेली आहे. आणि त्यांनी दिलेले माहितीनुसार आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून या परीक्षेत सुरू होणार आहे.

या परीक्षेसाठी जवळपास 70 हजार विद्यार्थी बसलेले आहेत. 100 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. द्वितीय आणि अंतिम वर्षातील विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेसाठी असणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत. ही परीक्षा 40 ते 45 दिवसांची असेल आणि परीक्षेचा निकाल देखील वेळेत लावण्यात येईल अशी माहिती समोर आलेली आहे.