1 जून पासून अनलॉक होण्याची प्रतीक्षा; व्यापारी झाले हतबल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । कोरोनाचे प्रादुर्भाव वाढल्यानंतर शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला तब्बल दोन महिने झाल्यानंतर आता व्यापारांना अनलॉकचे वेध लागले असून एक जून पासून व्यापार सुरू होण्याची अपेक्षा आणि प्रतीक्षा आहे. दोन महिन्यांपासून बंद असलेली बाजारपेठ एक जून पासून उघडण्याची मागणी शहरातील 25000 व्यापार यांच्या वतीने जिल्हा व्यापारी महासंघाने केली आहे.

व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे ‘ब्रेक द चेन’ सुरू होऊन दोन महिने उलटले. यात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून शासनाला सहकार्य केले. याकाळात व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. राज्य सरकार कडून अजूनही व्यापारी वर्गासाठी कोणतेही आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले नाही. मालमत्ताकर वीज बिल जीएसटी सह अन्य करात कोणतीही सूट दिली नाही.

दुकानातील कामगारांना पगार, दुकान भाडे, स्वतःचा घर खर्च भागवण,औषधोपचार खर्च, कर्जावरील व्याज, त्याच पावसाळ्या पूर्वीची करायची देखभाल-दुरुस्ती असे अनेक कामे प्रलंबित केले आहेत. आता जिल्ह्यात कोरणा रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे त्याचा विचार करून एक जून पासून सर्व दुकाने उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी, असे निवेदनात म्हटले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, लक्ष्मीनारायण राठी, जयवंत देवळाणकर, संतोष कावळे यांच्या शिष्टमंडळात समावेश होता.

Leave a Comment