दिल्ली प्रतिनिधी । उन्नावमध्ये ४ जून २०१७ रोजी अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निकाल आज दिल्ली न्यायालयाने दिला असून भाजप आमदार कुलदीप सेंगरला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ नुसार सेंगरला दोषी ठरवण्यात आलं आहे. बाल लैंगिक अत्याचारांना प्रतिबंध करणारा पोस्को कायदाही सेंगरला शिक्षा देताना लावण्यात आला आहे.या प्रकरणातील दुसरा आरोपी शशी सिंग याना पुरेशा पुराव्यांअभावी दोषी ठरवण्यात आलं आहे. चार्जशीट दाखल करायला उशीर केल्याबद्दल सीबीआयलाही न्यायालयाने फटकारलं आहे.
बलात्कार प्रकरणानंतर मुलीच्या वडिलांना पोलिसांनी पोलीस कोठडीत मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता, शिवाय या कुटुंबातील महिलांवर जीवघेणा हल्लाही काही काळापूर्वी करण्यात आला होता. उन्नाव प्रकरणात पीडित असलेली तरुणी काही दिवसांपूर्वीच पुन्हा करण्यात आलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली होती. या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटले असून दोषी सेंगरला आता काय शिक्षा होणार याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.