हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतातील सर्वात वेगवान आणि सर्वाधिक व्यस्त असलेले शॉट व्हिडिओ ॲप ‘जोश’ (Josh) आणि सर्वात प्रसिद्ध मीडिया प्लॅटफॉर्म ‘डेलीहंट’ (Dailyhunt) राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त ‘श्री राम मंत्र जप कक्ष’ चे अनावरण करत आहे. जो एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. हे कक्ष मंत्रोच्चारासाठी एक व्यासपीठ म्हणून वापरकर्त्यांना एकत्रितपणे राम भक्तीवर लक्ष केंद्रित करून आध्यात्मिक मंत्रांचे जप करण्यास आमंत्रित करते.
या जप कक्षामध्ये “श्री राम, जय राम, जय जय राम” या मंत्राचे पहिले डिजिटल जप सत्र पाहायला मिळेल. तसेच यामध्ये सर्व यूजर्स एकत्रितपणे सामील होऊ शकतात. आणि 11, 108 किंवा 1008 वेळा मंत्राचा जप करू शकतात. हा जप पूर्ण झाल्यावर सर्व सहभागींना ऐतिहासिक कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याबद्दल वैयक्तिक प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच सर्व दर्शकांचे जोशवरील श्री राम मंत्र जप कक्षामध्ये सामील होण्यासाठी आणि श्री राम यांना समर्पित केलेले पृष्ठ पाहण्यासाठी स्वागत आहे. याठिकाणी दर्शक थीम असलेली पार्श्वभूमी निवडून आणि श्री राम यांना समर्पित केलेल्या गाण्यांची क्यूरेटेड प्लेलिस्ट निवडून आपल्या अनुभवामध्ये आणखीन भर वाढवू शकतात. जोश ॲप यूजर्स हे मित्र आणि कुटुंबीयांना देखील मंत्र कक्षात सामील होण्यासाठी आणि या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करू शकतात.
तर दुसरीकडे, डेलीहंटवर वापरकर्ते लाइव्ह फीडद्वारे अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाचा लाईव्ह-स्ट्रीम अनुभव घेऊ शकतात. ऑडिओ अपडेट्स, पॉडकास्ट, राम कथा आणि विविध प्रकारचे परस्पर विजेट एक्सप्लोर करून यूजर्स स्वतःला प्रोग्राममध्ये मग्न करू शकतात. जोशच्या एका प्रवक्तांनी सांगितले आहे की, ‘श्री राम मंत्र जप रूम’ हा आमच्या समुदायाला नवा अनुभव आणण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा डिजिटल उपक्रम राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त वापरकर्त्यांना एकत्रितपणे श्री राम मंत्राचा जप करण्याच्या अध्यात्मिक अभ्यासात सहभागी होण्यासाठी आणि आपुलकी तसेच शांततेची भावना वाढवण्यासाठी आमंत्रित करतो. आम्हाला आशा आहे की, जोश आणि डेलीहंटने सुरू केलेल्या या अध्यात्मिक उपक्रमात प्रेक्षक मोठ्या संख्येने सहभागी होऊन ऐतिहासिक कार्यक्रमाचा एक भाग बनतील. हा उपक्रम देशभरातील 1 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांना एकत्र आणेल . तसेच भौगोलिक सीमा ओलांडून श्रद्धा आणि आदराच्या सामायिक अनुभवाने अंतःकरणांना एकत्र आणण्यास मदत करेल.