हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेश आणि बिहारने नेहमीच वर्चस्व गाजवलं आहे. जेव्हा जेव्हा देशाच्या राजकारणाचा विचार होतो तेव्हा तेव्हा या दोन्ही राज्याची नावे आवर्जून घेतली जातात. आता तर अंतराळात सुद्धा उत्तर प्रदेश आणि बिहारचे नाव घेतलं जातंय. भारताच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेने (पीआरएल) मंगळावर (Mars) तीन अज्ञात विवर शोधले आहेत. यातील २ विवरला उत्तरप्रदेश आणि बिहारमधील दोन शहरांची नावे दिली आहेत. तर तिसऱ्या विवरला भूभौतिकशास्त्रज्ञचे नाव देण्यात आलं आहे.
जेव्हाही अंतराळात एखादी गोष्ट पहिल्यांदा शोधली जाते तेव्हा त्याला नाव द्यावे लागते. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन (IAU) कडे याची जबाबदारी आहे. नुकतेच भौतिक संशोधन प्रयोगशाळेने मंगळावर तीन अज्ञात विवर शोधले असून त्यांना लाल विवर, मुर्सन क्रेटर आणि हिल्सा क्रेटर अशी नावे देण्यात आली आहेत. एका विवराचे नाव उत्तरप्रदेशातील हातरस जिल्ह्यातील नगर पंचायत ‘मुरसान’ शी संबंधित आहे. दुसरे नाव बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील ‘हिलसा’ या उपविभागाशी संबंधित आहे. त्याच वेळी, तिसऱ्या विवरचे नाव प्रसिद्ध भूभौतिकशास्त्रज्ञ आणि पीआरएलचे माजी संचालक, प्रोफेसर देवेंद्र लाल यांना समर्पित करण्यात आले आहे.
यातील मुर्सन विवराची रुंदी 10 किलोमीटर आहे, तर हिल्सा विवराची रुंदी 10 किलोमीटर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि आपल्या भारतात इतकी मोठमोठी शहरे आणि राज्ये असताना या दोन्ही विवरला मुर्सन आणि हिल्सा अशी नावे का दिली असतील? तर याचे कारण म्हणजे मुर्सन हे नाव पीआरएलचे विद्यमान संचालक डॉ. अनिल भारद्वाज, ज्यांचे जन्मस्थान आहे तर हिल्सा हे डॉ. राजीव रंजन भारती यांचे जन्मस्थान आहे जे मंगळावर नवीन विवर शोधणाऱ्या टीमचा भाग होते. तर लाल क्रेटर हे पीआरएलचे माजी संचालक प्रोफेसर देवेंद्र लाल यांना समर्पित करण्यात आले आहे.अहवालानुसार, हा शोध वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे.