हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपट ‘शेरनी’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन दिसत आहे. यात ती एका करारी वन अधिकाऱ्याच्या निश्चयी भूमिकेत झळकणार आहे. न्यूटन’ चित्रपट फेम, पारितोषिक विजेता फिल्ममेकर अमित मसुरकर याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आपल्या पितृसत्ताक जीवनपद्धतीत सामाजिक अडथळे निर्माण करणारी अनेक मानवी श्वापदे वावरत असतात. विद्या ज्या विभागात कार्यरत असते, तिथली उदासीनता तिला आणखी जोशाने स्वत:ची धमक सिद्ध करण्याची प्रेरणा देते. या चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत रोमांचक असून विद्याने साकारलेल्या भूमिकेच्या निश्चियी आणि निधड्या प्रवासावर भाष्य करतो.
या चित्रपटाचे वास्तविक जग अत्यंत चमत्कारी आहे. आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या विविध व्यक्तिरेखांनी ते भरलेले आहे. या चित्रपटात आपली नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य कशी सांभाळते ते दाखवले आहे. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला कश्या पद्धतीने करावा लागतो, हे यात आपल्याला पाहायला मिळेल. या चित्रपटात विद्यासह शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी या कलाकारांच्याही अन्य मुख्य भूमिका असतील.
https://www.instagram.com/p/CPmwgCBhU_V/?utm_source=ig_web_copy_link
या चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलताना दिग्दर्शक अमित मसुरकर म्हणाले, “शेरनी’च्या कथानकाला काटेरी पैलू आहेत. या निमित्ताने मनुष्य आणि पशू यांच्यातील संघर्षाची जटिलतेचा वेध घेण्यात आला आहे. विद्या बालनने मीड-लेव्हल फॉरेस्ट ऑफिसरची व्यक्तिरेखा साकारली असून अडथळे आणि तणावपूर्ण स्थितीतही ती आपल्या टीम व स्थानिकांसह पर्यावरणाचा समतोल राखण्याचे ती काम करत असते. विद्या, अन्य सुंदर कलाकार आणि फारच प्रतिभावान क्रूसोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. अमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर शेरनी प्रसिद्ध होणार असल्याने ही कथा भारत आणि जगभर विस्तृत तसेच वैविध्यपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला मदतीची ठरेल.”