हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upcoming Marathi Movie) मराठी सिनेसृष्टीत अनेक दिग्दर्शक इतिहासाचा अभ्यास करत आहेत. रुपेरी पडद्यावर आपला भव्य इतिहास दर्शविण्यासाठी त्यांची सुरु असलेली धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे. गेल्या काही काळात इतिहासातील अनेक सुवर्ण पाने रुपेरी पडद्यावर उलगडली. प्रेक्षकांनी या प्रत्येक ऐतिहासिक चित्रपटाला विशेष दाद दिली. यानंतर आता आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाचे नाव ‘रणधुरंधर..’ असे आहे.
गणराज स्टुडिओ प्रस्तुत आणि श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘रणधुरंधर..’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणारा हा चित्रपट पुढच्या वर्षी २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुख्य आणि विशेष बाब सांगायची म्हणजे हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Upcoming Marathi Movie) यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, गुजराथी आणि पंजाबी या भाषांचा समावेश आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भाषिकांना मराठ्यांचा भव्य पराक्रमी इतिहास जाणून घेता येणार आहे. या चित्रपटासाठी भाग्यश्री जाधव, अमित भानुशाली, अनुप अशोक देशपांडे यांनी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.
यापूर्वीही गणराज स्टुडिओ आणि अमित भानुशाली यांनी एकत्र काम केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते या चित्रपटाच्या माध्यमातून अशीच एक दर्जेदार कलाकृती घेऊन येत आहेत. या चित्रपटात नेमके कलाकार कोण असणार? आणि त्या कलाकारांच्या काय भूमिका असणार? (Upcoming Marathi Movie) याबाबत सध्या तरी गोपनीयता राखण्यात आली आहे. पॅन इंडिया असलेला हा चित्रपट भव्यदिव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक श्रेयस जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रणधुरंधराची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश… (Upcoming Marathi Movie)
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणाले की, ‘ही कहाणी वीर योद्धांची आहे. लढाईत शत्रूला भयभीत करून सोडणाऱ्या रणधुरंधराची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून याची भव्यता तुम्हाला चित्रपट पाहूनच जाणवेल’. श्रेयश जाधव यांनी यापूर्वी ‘मी पण सचिन’, ‘फकाट’ असे जबरदस्त चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. लवकरच त्यांचे ‘डंका हरिनामाचा’, ‘जंतर मंतर छू मंतर’ हे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Upcoming Marathi Movie)