हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Aadhaar Card हे महत्वाच्या कागद्पत्रांपैकी एक बनले आहे. याशिवाय कोणतेही काम करणे जवळपास अशक्य बनले आहे. अशातच जर आपल्या आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर ते अडचणीचे ठरू शकेल. जर आपल्याला आधार कार्डशी संबंधित कोणत्याही प्रकारची अडचण जाणवत असेल तर आता फक्त एकच नंबर डायल करून ती सोडवता येऊ शकेल. कारण आता Aadhaar Card धारकांना आधारशी संबंधित अनेक समस्याच्या निराकरणासाठी 1947 नंबर डायल करून सर्व समस्या सोडवता येतील. UIDAI ने एक ट्विट करत या क्रमांकाबाबतची माहिती दिली आहे. तसेच हा क्रमांक 12 भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.
UIDAI ने केले ट्विट
UIDAI ने ट्विट करत म्हंटले की, आता आधारशी संबंधित सर्व समस्या एका फोन कॉलवर सोडवल्या जातील. आधार हेल्पलाइन 1947 हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू या 12 भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले गेले आहे. #Dial1947ForAadhaar वर आपल्या आवडीच्या भाषेत संवाद साधू शकता.
UIDAI ने जारी केला क्रमांक
हे लक्षात घ्या कि, UIDAI कडून हा क्रमांक जारी केला जातो. हा हेल्पलाइन क्रमांक 1947 आहे. या साली आपला देश स्वतंत्र झाला असल्याने तो लक्षात ठेवायला देखील खूप सोपा आहे.
हा 1947 क्रमांक विनामूल्य आहे जो IVRS मोडवर वर्षभर चोवीस तास उपलब्ध असतो. तसेच या सुविधेसाठी कॉल सेंटरचे प्रतिनिधी सकाळी 7 ते रात्री 11 (सोमवार ते शनिवार) उपलब्ध असतात. त्याचबरोबर रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेतही हे प्रतिनिधी उपलब्ध असतात. Aadhaar Card
हा हेल्पलाइन क्रमांक लोकांना आधार रजिस्ट्रेशन केंद्रे, एनरोलमेंटनंतर आधार क्रमांकाचे स्टेट्स आणि Aadhaar Card शी संबंधित इतर माहिती देतो. याशिवाय जर कोणाचे आधार कार्ड हरवले असेल किंवा पोस्टाने अद्याप मिळाले नसेल तर या सुविधेच्या मदतीने माहिती मिळवता येईल.
अशा प्रकारे PVC Aadhaar Card बनवा
1. नवीन आधार PVC कार्डसाठी UIDAI च्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
2. यानंतर ‘My Aadhaar’ विभागात जा आणि ‘Order Aadhaar PVC Card’ वर क्लिक करा.
3. आता, 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधार एनरोलमेंट आयडी (EID) टाकावा लागेल.
4. आता सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा भरा आणि OTP साठी Send OTP वर क्लिक करा.
5. यानंतर रजिस्टर्ड मोबाईलवर मिळालेला OTP टाका.
6. आता आपल्याकडे आधार पीव्हीसी कार्डचे प्रीव्यू शो असेल.
7. यानंतर खाली दिलेल्या पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
8. यानंतर पेमेंट पेजवर जाऊन 50 रुपये शुल्क जमा करावे लागेल.
9. पेमेंट पूर्ण केल्यानंतर आधार पीव्हीसी कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. Aadhaar Card
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/
हे पण वाचा :
Interest Rates : ‘या’ चार बँका बचत खात्यावर देत आहेत सर्वाधिक व्याज, नवीन दर तपासा
PNB ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याज दर तपासा
नवीन बदल अन् फीचर्स सहित पुन्हा लाँच होणार Yamaha RX 100, कंपनीने दिले सूतोवाच
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधी रुपयांचा नफा !!!
Train Cancelled : दिवाळीनंतरही रेल्वेकडून 116 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा