Monday, January 30, 2023

‘दिवा विझतो तेव्हा तो फडफड करतो’, रवी राणांचा बच्चू कडूंना खोचक टोला

- Advertisement -

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यातील दोन आमदारांमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (bachchu kadu) यांच्यावर नाव न घेता खोचक टीका केली आहे. रवी राणा यांनी ट्विट करत बच्चू कडूंवर (bachchu kadu) नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘दिवा विझतो तेव्हा तो फडफड करतो’, अशा प्रकारचे ट्विट करून त्यांनी आमदार बच्चू कडू (bachchu kadu) यांच्यावर निशाणा साधला आहे.

बच्चू कडू यांनी दिला होता इशारा
बच्चू कडू (bachchu kadu) यांनी याआधीच रवी राणा यांना 1 ऑक्टोबरपर्यंत केलेल्या आरोपांप्रकरणी पुरावा सादर करण्यास सांगितले आणि जर ते केले नाहीतर सात ते आठ आमदार आपल्या संपर्कात असून सरकारमधून बाहेर पडू असा इशारा बच्चू कडू (bachchu kadu) यांनी दिला आहे. यावरून रवी राणा यांनी खोचक टीका केली आहे. बच्चू कडू यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आमदार रवी राणा यांनी आपली भूमिका मांडत “दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला ‘हा’ एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला ‘हा’ फुसका फटाका आहे”, अशा खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे रवी राणा यांच्या अगोदर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीदेखील बच्चू कडू यांना उद्देशून महत्त्वाचं विधान केले आहे. “आता कुणाच्या संपर्कात कोण आहे, कुणी संपर्कात असेल तर त्यांना लगेच पक्षप्रवेश द्या. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत”, असे विधान अब्दुल सत्तार यांनी केले होते. यानंतर आता रवी राणा यांनी निशाणा साधल्यामुळे बच्चू कडू (bachchu kadu) अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. आता बच्चू कडू पुढे काय निर्णय घेतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!