हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचे जग हे तंत्रज्ञानाचे जग असून आर्थिक व्यवहार सुद्धा डिजिटल झाले आहेत. आजकाल पैसे काढण्यासाठी बँकेत जाऊन रांगेत उभा राहण्याची गरज भासत नाही, कारण ठिकठिकाणी ATM मशीन उपलब्ध असून अवघ्या काही सेकंदात आपण एटीएम कार्डच्या मदतीने पैसे काढू शकतो. मात्र कधी कधी असेही होते कि आपल्याला पैशाची नितातं गरज असते आणि आपल्या खिशात ATM कार्डच नसते. परंतु तुम्हाला माहितेय का? तंत्रज्ञानाने इतकी मोठी प्रगती केली आहे कि तुम्ही खिशात एटीएम कार्ड नसताना तुम्हीच एटीएम मधून पैसे काढू शकता. होय, UPI ATM असं या टेक्निकचे नाव आहे.
UPI ATM ही एक अशी सुविधा आहे जी तुम्हाला कार्डशिवाय देखील ATM मधून पैसे काढण्याची परवानगी देते. UPI एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला फक्त UPI ॲपसह स्मार्टफोन आणि रजिस्टर UPI आयडी आवश्यक असेल. तसेच तुम्हाला असं ATM शोधावं लागेल जे UPI द्वारे कॅश काढण्याची सेवा देते. अशा एटीएमवर UPI सपोर्टिव्ह एटीएम म्हणून लेबल लावले जातात. तुम्हाला सुद्धा UPI ATM मधुन पैसे काढायचे असतील तर ते कसे काढावे? कोणकोणत्या स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील याबाबत आम्ही अगदी सोप्प्या भाषेत तुम्हाला सांगणार आहोत.
ATM शिवाय पैसे कसे काढायचे? UPI ATM
तुमचा नंबर UPI रजिस्टर असेल तर तुम्ही UPI-ATM वापरू शकता.
ATM मशिनमधील UPI कॅश विहड्रॉल/कार्डलेस कॅश किंवा क्यूआर कॅश पर्यायावर क्लिक करा.
यानंतर, तुम्हाला जेवढी रक्कम पाहिजे तो आकडा त्याठिकाणी टाकावा लागेल.
रक्कम एंटर केल्यानंतर, एटीएम मशीनवर सिंगल यूज डायनॅमिक QR कोड दिसेल.
तुम्ही हा कोड कोणत्याही UPI ॲपद्वारे (PhonePe, Paytm, GooglePay इ.) स्कॅन करू शकता.
कोड स्कॅन केल्यानंतर, तुमचा UPI पिन टाका आणि तुमचे काम पूर्ण होईल.
आता एटीएममधून पैसे बाहेर येतील.