UPI Credit Card | मोदी सरकारने डिजिटल इंडिया केल्यापासून सगळे आर्थिक व्यवहार आता ऑनलाईन पद्धतीने व्हायला लागलेले आहेत. देशातील बहुतांश लोक हे UPI चा वापर करून सगळे पेमेंट्स करत असतात. तुमच्या बँक खात्यात किंवा पैसे असतात तेव्हा तुम्ही UPI चा वापर करून तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी विकत घेऊ शकता. त्याचप्रमाणे दुसऱ्यांना पैसे पाठवू शकता आणि घेऊ देखील शकता. त्याचप्रमाणे शॉपिंगला गेल्यावरही आजकाल सगळ्या शॉपमध्ये UPI स्कॅनर (UPI Credit Card) असतो. ज्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. परंतु जर आता इथून पुढे तुमच्या खात्यामध्ये पैसे नसले. तरी देखील तुम्ही UPI च्या मदतीने तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी सहज खरेदी करू शकणार आहात.
कारण NPCI RBI च्या मदतीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध केली आहेत. तुम्ही देखील UPI वापरत असा, तर ही सुविधा तुम्हाला तुमच्यासाठी देखील असणार आहे. पहिल्यांदाच UPI युजरसाठी ही एक नवीन सुविधा आलेली आहे. ती म्हणजे आता तुम्ही तुमचे UPI हे क्रेडिट कार्ड (UPI Credit Card) प्रमाणे वापरू शकणार आहात. म्हणजेच तुमच्याकडे पैसे नसेल तरी देखील तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी विकत घेऊ शकणार आहात.
सुविधा कोणाला मिळणार ? | UPI Credit Card
NPCI ने आणलेली ही सुविधा काही निवडक बँकांना मिळणार आहे. यामध्ये तुमचे UPI अकाउंट हे एका क्रेडिट कार्ड प्रमाणे काम करणार आहे. ही सिस्टीम Buy Now, Pay Later यावर आधारित असणार आहे. भारतीय रिझर्व बँकेने काही बँकांनाही सुविधा देण्यासाठी परवानगी देखील दिलेली आहे.
कोणत्या बँकांचा समावेश ?
यूपीसीआयने आणलेली ही सुविधा अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक आणि पीएनबी या बँकांना असणार आहे. केवळ या बँकेचे ग्राहक UPI द्वारे या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहे.
या सुविधेअंतर्गत बँकेकडून तुम्हाला एका मर्यादेपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. बँकेने दिलेल्या मुदतीत हे कर्ज तुम्हाला परत द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे खर्च केलेल्या रकमेचे व्याज देखील तुम्हाला भरावे लागणार आहे. तुम्हाला जर दुकानात काही वस्तू खरेदी करायची असेल, आणि तुमच्याकडे पैसे नसेल, तर तुम्ही या सुविधेचा वापर करू शकता.