UPI Payment Limit Increased : आता 5 लाखांपर्यंत करा डिजिटल पेमेंट; NPCI चा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

UPI Payment Limit Increased। आजकालचे युग हे टेक्नॉलॉजीचे युग आहे. इथे सर्व काही ऑनलाईन पद्धतीने केलं जात आहे. यामुळे माणसाचे कष्ट आणि मेहनत वाचत आहे तर कमी वेळेत अनेक कामे होत आहेत. अगदी एकमेकांना पैसे देताना सुद्धा आपण थेट कॅश न देता UPI च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करत असतो. मात्र यूपीआयचे व्यवहार करण्यासाठी असलेली डेली लिमीट अनेकांसाठी अडचणीचा विषय ठरत होती. जास्तीचे पैसे पाठवायचं असतानाही ते पाठवता येत नाही तशी तक्रार अनेकजणांकडून केली जात होती. यावरच आता नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक मोठा निर्णय घेतला आजपासून म्हणजे 16 सप्टेंबरपासून UPI च्या रोजच्या व्यवहारात वाढ करण्यात आली आहे. आता तुम्ही दिवसाला ५ लाखांपर्यंत डिजिटल पेमेंट करू शकता.

कोणत्या ठिकाणी करू शकता 5 लाखांपर्यंत बिल? UPI Payment Limit Increased

UPI ची मूळ कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने ऑनलाइन पेमेंट मर्यादा 5 लाख रुपये केली आहे. मात्र, ही सुविधा विशिष्ट श्रेणीसाठी उपलब्ध असेल. त्यानुसार, रुग्णालयाचे बील (Hospital Bill), शैक्षणिक संस्थांची फी (Educational Fees), आयपीओ (IPO) आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट स्कीम्स (Retail Direct Schemes) या सारख्या व्यवहारांसाठीही आता 5 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार आहेत. NPCI ने सर्व बँका, PSPs आणि UPI ॲप्सना ऑनलाइन पेमेंटसाठी काही श्रेणींमध्ये व्यवहार मर्यादा वाढवली आहे याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

NPCI च्या निर्णयामुळे (UPI Payment Limit Increased) जर कोणाचा जवळचा व्यक्ती समजा हॉस्पिटलमध्ये असेल तर भल्यामोठ्या रकमेचं बिल भरताना इथून पुढे कोणतीही अडचण येणार नाही, तसेच मुलांची शैक्षणिक फी सुद्धा इमर्जंसीच्या वेळी तुम्ही तात्काळ भरू शकता. याशिवाय IPO साठी अर्ज करण्यासाठी सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. यापूर्वी सुद्धा NPCI ने डिसेंबर 2021 आणि डिसेंबर 2023 मध्ये यूपीआय ट्रान्जेक्शनच्या मर्यादेत बदल केला होता. सध्या यूपीआय सर्कलच्या माध्यमातून एकाच खात्यावरून अनेक लोकांना व्यवहार करण्याची सोय सुद्धा एनपीसीआय कडून करण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही आर्थिक व्यवहार करणे ग्राहकांसाठी अतिशय सोप्प झालं आहे.