UPI Payment | Internet शिवाय करा Online Payment; फक्त वापरा सोप्पी पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

UPI Payment | आजकाल ऑनलाईन पेमेंट ही सुविधा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अनेक लोक हे आता कॅश पेमेंट न करता ऑनलाइन पेमेंट करतात. त्यामुळेच आपल्याला संपूर्ण हिस्टरी समजते. आपण कुठे खर्च केलेला आहे. या सगळ्याची माहिती मिळते. परंतु ऑनलाईन पेमेंट करायचे म्हटलं तर त्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील चांगली असावी लागते. परंतु कधी कधी आपण अशा ठिकाणी अडकतो, जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली नसते. त्यामुळे आपले पेमेंट अडकते. आणि इंटरनेट नसताना यूपीआय द्वारे पैसे पाठवणे देखील खूप कठीण होऊन जाते. परंतु आता याची काय काळजी करायची गरज नाही. कारण आता यूपीआयद्वारे (UPI Payment) तुम्ही इंटरनेटशिवायही पैसे पाठवू शकता.

तुम्ही फोनवरून एक विशेष USSD कोड डायल करून पेमेंट करू शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. याt तुम्ही इंटरनेट नसतानाही ऑनलाईन पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला *99# हा कोड वापरून पैसे पाठवावे लागेल. किंवा पैसे तुम्हाला येऊ देखील शकतात यासाठी तुम्ही यूपीआय (UPI Payment) पिन सेट करू शकता. आता आपण हा कोड वापरून पैसे कसे पाठवायचे? याची पद्धत जाणून घेऊया.

इंटरनेट नसताना पैसे कसे पाठवायचे ? | UPI Payment

  • तुम्ही तुमच्या बँकेची लिंक असणाऱ्या मोबाईल नंबर वरून *99# हा कोड डायल करा. आणि तुमच्या स्क्रीनवर बँकेची सर्व माहिती उपलब्ध येईल.
  • यामध्ये पैसे पाठवा किंवा पैसे मागवा बॅलन्स चेक करा ज्याची माहिती तुम्हाला पाहिजे आहे तो पर्याय निवडा.
  • तुम्हाला जर पैसे पाठवायचे असेल तर 1 टाईप करा आणि सेंट या बटणावर टॅप करा.
  • त्यानंतर तुम्ही पैसे पाठवण्याची पद्धत निवडायची आहे. म्हणजे जसे की युपीआय आयडी किंवा इतर कुठला पर्याय असेल तर त्यावर तुम्हाला पैसे पाठवायचे आहे.
  • जर तुम्ही मोबाईल नंबरवरून पैसे पाठवत असाल तर ज्याला पैसे पाठवायचे आहे. त्याचा यूपीआय खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाईप करा आणि नंतर सेंड यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला जेवढी रक्कम टाकायची आहे तेवढी रक्कम एंटर करा सेंड या बटनावर क्लिक करा
  • त्यानंतर तुमचा यूपीआय पिन एंटर करा.
  • अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील यूपीआय पेमेंट द्वारे पैसे पाठवू शकता