UPSC 2021 ची प्रिलीमनरी परीक्षा पुढे ढकलली, पहा परीक्षेची नवी तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन दहावीची परीक्षा रद्द करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन सुरू आहेत. मात्र आता यूपीएससी परीक्षा 2021 UPSC 2021 बाबत मोठा निर्णय समोर आला आहे. यूपीएससी 2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

 

ही परीक्षा 27 जून 2019 रोजी होणार होती मात्र आता ती 10-10-2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय यूपीएससीने घेतला आहे.त्यामुळे जे विद्यार्थी सध्या यूपीएससी 2021 परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी ठरली आहे. यूपीएससी सिविल सर्विसची ही परीक्षा लांबणीवर टाकली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Leave a Comment