UPSC PA Recruitment 2024 | आज-काल अनेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने वैयक्तिक सहाय्यक पदासाठी अर्ज मागवलेले आहेत. इच्छुक विद्यार्थी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, संघटना कामगार आणि रोजगार मंत्रालयामध्ये वैयक्तिक सहाय्यक पदासाठी 323 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या ठिकाणी अर्ज करायची शेवटची तारीख ही 27 मार्च 2024 ही आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करू शकता.
या निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेचा देखील समावेश आहे. ही लेखी परीक्षा 2 तासाची होणार आहे. अनेक पर्यायांसह वस्तुनिष्ठ प्रकारची ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी माध्यमात असणार आहे.
रिक्त पदे तपशील
या यूपीएससी भरतीसाठी 323 पदांची वेगवेगळ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता | UPSC PA Recruitment 2024
यूपीएससीच्या (UPSC PA Recruitment 2024) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी मिळणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
इडब्ल्यू एससी, एसटीसाठी 30 वर्ष, ओबीसी साठी 33 वर्ष इतर कॅटेगिरी साठी 35 वर्ष ही वयोमर्यादा आहे.
अर्ज फी
महिला एससी, एसटी अपंगत्व विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी सूट देण्यात आलेली आहे. त्यांना केवळ 25 रुपये भरावे लागणार आहेत. एसबीआय बँकेच्या शाखेत जाऊन बँकेच्या नेटच्या बँकिंग सुविधेने तुम्हीही भरू शकता.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा